११ फेब्रुवारी-परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ नाही
NEWS24सह्याद्रि
अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला.
बेसुमार झाडांच्या कत्तलींमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात होणारी घट, बेफाम वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रांची झालेली चाळणी, पाणथळीच्या जागांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे जैवविविधतेचा वारसा धोक्यात येत असून निसर्गाची होत असलेली ही धूळधाण हा चिंतेचा विषय ठरली आहे.
वर्षभर किंवा वर्षांतील काही महिने पाण्याखाली राहणाऱ्या जमिनींना पाणथळ असे म्हणतात. अलीकडे शासनाने पाणथळीबाबत जी नवी धोरणे आखली त्यामुळे पाणथळींची व्याख्याही बदलली आणि अशा पाणथळींचे जतन वा संरक्षण करण्याऐवजी त्या बुजवून अशा जमिनी नागरीकरणासाठी खुल्या करणेही सोयीचे झाले. विशेषत: अनेक शहरालगतच्या अशा सखल जमिनींवर अनेक ठिकाणी वस्त्या उभ्या राहिल्या यात पाणथळीही नष्ट झाल्या आणि त्या बरोबरच जैवविविधतेचा वारसाही नष्ट झाला. शासनाच्या नव्या निकषानुसार तर परभणी जिल्ह्यात एकही पाणथळ उरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे...