१३ फेब्रुवारी-सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द
NEWS24सह्याद्रि
सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द करण्यात आल्या आहेत.तसेच यापुढे पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं कोल्हापूर-मुंबई-सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार,केवळ हंगामामध्ये फुल्ल, इतरवेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत.याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापुढे फक्त 150 किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 150 कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे.त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे.
२७ डिसेंबर - जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री : अहमदनगर- बीड -परळी रेल्वे मार्गासाठी निधी प्राप्त....पहा !अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या खाली दिलेल्या लिंकवर
----------------------
*शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. काळे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना*
----------------------
*अहमदनगर- बीड -परळी रेल्वे मार्गासाठी निधी प्राप्त*
----------------------
*शोष खड्ड्यात गुदमरून दोन जणांचा मृत्यू*
१७ डिसेंबर - वेगवान आढावा
NEWS24सह्याद्री: ४१ वर्षांपासून न्यायालयात बलात्काराचा खटला सुरु पहा ! देशविदेशातल्या महत्वाच्या बातम्या...
नव्या वर्षात विमान प्रवास होणार स्वस्त
---------------------
टीईटी परीक्षेत आयुक्त तुकाराम सुपेंना अटक
---------------------
मध्य रेल्वेवरील ठाणे- दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी मेगाब्लॉक
---------------------
१ कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी जप्त
---------------------
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार