१० जानेवारी -Breaking न्यूज
NEWS24 सह्याद्री - शहरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
अहमदनगर मधील सावेडी परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. कुष्ठधाम रोडवर असलेल्या ओढ्याच्या शेजारील विहिरीजवळ हा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या मृतदेहाची माहिती कळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव उषा राजेंद कानडे असे आहे. या महिलेची काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. सध्या पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या महिलेने आत्महत्त्या केली कि तिची हत्या केलीये याचा तपस आता तोफखाना पोलीस करत आहेत.
No comments
Post a Comment