Breaking News

1/breakingnews/recent

१६ नोव्हेंबर -मोठी बातमी

No comments

 NEWS24सहयाद्री - नगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेला गालबोट - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...


नुकत्याच सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' या नाटकाच्या सादरीकरण दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीत असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, 'हे नाटक बंद करा'अशी घोषणाबाजी केली.

अखेर हा वाद मिटवण्यासाठी तोफखाना पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला. मात्र यावेळी याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचे सावरकर प्रेमींकडून सांगण्यात आले. येथील स्वराज्य प्रतिष्ठानने मंगळवारी राज्य नाट्य स्पर्धेत 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' हे नाटक सादर केले. मात्र या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला.विशेष म्हणजे नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभा राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत, हे नाटक सादर करणारे कलाकारांचा दिग्दर्शकांचा व स्पर्धेच्या आयोजकांचे निषेध केला. तसेच नाटकानंतर स्वतःच्या भावना व्यक्त करताना या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *