Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी- पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार

No comments

 


NEWS24सह्याद्रि  

1 फेब्रुवारीपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत.मात्र पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या अर्धवेळ भरवल्या होत्या. त्या आता पूर्णवेळ भरतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना अजून संपलेला नाही. कारण अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे.त्यामुळे एक दोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.  पुण्यात, राज्यात,  देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. 5 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, जंबो कोवीड सेंटर सध्या उभे आहे, पण त्यामधे रुग्ण नाहीत. मात्र,तरीही 28 फेब्रुवारीपर्यंत ते सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ कारण त्यासाठी भाडे द्यावे लागते असे पवार यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार  नाही. कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत.त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *