Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी-नितेश राणेंचा रक्तदाब वाढला

No comments

NEWS24सह्याद्रि 

सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, ओरोसमधून कोल्हापूरला नेणार; कुणालाही भेटण्यास मनाई

भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा अवधी संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलिसांकडून 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह  अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टोला लगावलाय.

नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. तरीही कोर्टाच्या आदेशानुसार ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता जसं रेग्युलर चेकअप होईल, डॉक्टरांना जे काही आढळून येईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं नितेश राणे यांचे वकील म्हणाले. त्यामुळे आता नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी पार पडेल.त्यानंतर त्यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *