४ फेब्रुवारी- गणेश जयंती निमित्ताने राज्यातील देवस्थानांचे गाभारे सजले
NEWS24सह्याद्री
आज गणेश जयंतीच्या दिवशी विधी, उपवास, पूजा आणि गणपतीची जन्मकथा सांगणे किंवा श्रवण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळावे आणि तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सजवण्यात आली आहेत.हिंदू धर्मातील गणेशीची पुजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम मानल्या जाणाऱ्या गणपतीचीच पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरा केला जाईल.शुक्रवारी सकाळी 04:38 ते 05 फेब्रुवारी 2022, ला माघ चतुर्थी आहे. शनिवारी सकाळी 03:47 पर्यंत असेल. देशाची राजधानी दिल्लीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा विशेष शुभ मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 01:41 पर्यंत असेल.
गणेश जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलीये.कामधेनू गाईचं प्रतिक असणारी सजावट यावर्षी मंदिराला करण्यात आली आहे. दूपारी 12 वाजता मंदिरात गणेश जयंतीची मुख्य कार्यक्रम केला जाणार आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरातील माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून कोरोनाचे सर्व नियमांच पालन करुन हा उत्सव साजरा करण्यात येतोय.यासाठी मंदिराला आकर्षक अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आलीय.या उत्सवाचे नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यामार्फत करण्यात आलेय.गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते त्यामुळे अनेक गणेश भक्तांना माघी गणेश उत्सवात मंदिरात प्रवेश मिळाला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रायगड मधील बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून होतोय. याबरोबरच यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झालाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment