४फेब्रुवारी-नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन
नागपुरात वंदे मातरम उद्यान साकारण्यात येणार आहे . परमवीर चक्राने सन्मानित भारतीय सेनेच्या स्मृतीनिमित्त हे उद्यान तयार करण्यात येतंय. शुक्रवारी म्हणजेच आज सायंकाळी सहा वाजता याचे भूमिपूजन होतेय.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने हे वंदे मातरम् उद्यान साकारण्यात येत आहे. मध्य नागपुरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस बजेरिया या परिसरातील एम्प्रेस मॉल समोर हे तयार होणाराय. महापालिकेला 1.20 लाख वर्गफूट जागेत हे होणाराय. कारगिल वॉर हीरो परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते एम्प्रेस सिटी मॉलच्या समोर साकारण्यात येणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाच्या
कार्याचे भूमिपूजन शुक्रवारी संध्याकाळी होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एम्प्रेस मॉलसमोरील 1.20 लाख वर्गफूट जागेत साकार होणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाची विशेषत:, येथील व्यवस्था, येथे उभारण्यात येणारे शहिदांचे सिरॅमिकचे म्युरल आदी सर्व बाबींची माहिती देणारी संकल्प चित्रफीत तयार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत चित्रफितचे प्रसारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांनी आवाज दिला आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लोकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि भारतीय सेनेत नागपूर शहरातील आणि विदर्भीय जनतेत सैन्य भरतीबद्दल आकर्षण निर्माण होवून वातावरण निर्मीती करण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्याला वैदर्भीय जनतेचे अभिवादन म्हणून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर कडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात 21 परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमेच्या आजूबाजूला लॅन्डस्केप करून प्रत्येक प्रतिमेला सुशोभित करण्यात येणार आहे.
No comments
Post a Comment