६ फेब्रुवारी-नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना पोलिसांच्या ताब्यात दिले नसल्याने या न्यायालयात नियमित जामीन अर्जावर सुनावणी होऊ नये, असा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात देत खटला वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यावर सोमवार दि.७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याप्रकरणी राणे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. आमदार राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार होती.
परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्याची मागणी केल्याने ही सुनावणी सोमवार दि. ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
No comments
Post a Comment