Breaking News

1/breakingnews/recent

७ फेब्रुवारी-लतादीदींच्या निधनाने नगरकर भावूक

No comments

                   

NEWS24सह्याद्री 

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने नगरकरही शोकाकुल झाले. शहरात अनेक भागात फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोनानगर भागातील महिला भजनी मंडळाने त्यांच्या अंतयात्रेसमयी भजने व त्यांची भक्तिगीते गाऊन श्रद्धांजली अर्पण केली.जादूई आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध केले. लताजी म्हणजे गान सरस्वतीच. एक कलाकार म्हणून लताजींचे चित्र  साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. हे शिवधनुष्य पेलत मी लताजी व त्यांच्या जोडीला सरस्वती असे चित्र साकारले. त्यांची सही असलेले कृष्णधवल छायाचित्र माझ्या संग्रही होते. परंतु स्टुडिओला लागलेल्या आगीत ते नष्ट झाले. पुन्हा त्यांची सही घेण्यासाठी सरस्वती व लताजी यांचे चित्र साकारले, परंतु अनेकदा प्रयत्न करूनही करोना संकटामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सरस्वतीचा आशीर्वाद व कृपादृष्टी असेल, तरच लताजींसारखा महान कलाकार घडू शकतो, अशा भावना मी या चित्रातून व्यक्त केल्या.– प्रमोद कांबळे, चित्रशिल्पकार.


लतादीदी नगर शहरातील दत्त देवस्थानमध्ये व गुरुदेव क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी १९९५, १९९६ व १९९७ अशा सलग तीन वर्ष राम शेवाळकर, व. दी. कुलकर्णी यांच्या समवेत आल्या होत्या. त्यानंतर १९९८ मध्ये गुरुदेव मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या भेटीसाठीही गेल्या होत्या. तेथे त्यांच्या संतचरित्रावर चर्चा रंगल्या होत्या. एकदा महाराज मौनामध्ये असताना लतादीदींनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुदेव मौनामध्ये असतानाही लतादीदी त्यांच्याशी संवाद साधू शकल्या.– मंदा जोशी, गुरुदेवांच्या शिष्य, नगर.

‘गाण्याचा आत्मा हिरावला’ एकशेतीस कोटी भारतीयांच्या मनातील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरावला, अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने आपण सर्वच जण भारतरत्नाला पारखे झालो आहोत, त्यांचा आवाज भारतीय सिनेमात अजरामर राहील.– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार. 

गाण्यातून जगणे शिकविणाऱ्या, त्याचा आनंद देणाऱ्या लतादीदींचे निधन वेदनादायी आहे. भूपाळी ते भैरवी अशा व्यापक गानप्रवासामुळे त्या रसिकांसह सर्वसामान्य माणसाला आपल्या वाटत राहिल्या. देशाने आज एक स्वररत्न गमावले. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेला सांगीतिक वारसा दीदींनी जोपासला आणि आपल्या भावंडांसह समृद्ध केला. शेवटच्या श्वासापर्यंत केलेली स्वरसाधना वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल.– राधाकृष्ण विखे , आमदार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *