७ फेब्रुवारी-नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
NEWS24सह्याद्रि
सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. मात्र या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका आता नितेश राणेंच्या या सुनावणीला बसणार आहे.
No comments
Post a Comment