७ फेब्रुवारी- प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं हृदयविकाराने निधन
NEWS24सह्याद्री -
महाराष्ट्राच्या कलासृष्टीत पोर्ट्रेट मास्टर अशी ओळख मिळालेले प्रसिद्ध चित्रकार दिलीप धोंडीराम बडे यांचं औरंगाबादेत निधन झालं. मूळचे अंबाजोहाई येथील रहिवासी असलेले दिलीप बडे हे औरंगाबादमधील शासकीय चित्रकला महाविद्यालयातून निवृत्त झाले होते. रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास प्रा. दिलीप बडे यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने ते पायी चालतच दवाखान्यात गेले. डॉक्टर तपासत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. 68 वर्षांचे दिलीप बडे हे औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयाच्या समोरील नंदनवन वसाहतीत रहात होते. त्यांच्यावर छावणीतील स्मशानभूमीत अंत्यांसस्कार करण्यात आले.
मूळचे अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले प्रा.दिलीप बडे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून त्यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरीत रुजू झाले. औरंगाबाद येथील गव्हर्नमेंट स्कूल ऑफ फाइन आर्टचे डीन या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या चित्रकलेच्या कारकीर्दीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व बाळासाहेब ठाकरे आदींची पोर्ट्रेट सर्वाधिक काढली आहेत. पोर्ट्रेट आर्टिस्ट अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काढलेले तैलचित्र विधान भवन, औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महापालिकेतही लावलेले आहेत. विशेषतः निळी साडी परिधान करून खुर्चीवर बसलेल्या रमाबाई आंबेडकरांचे पोर्ट्रेट सर्वत्र वापरले गेले. इराणच्या तेहरान विद्यापीठ आणि भोपाळसह देशभरात त्यांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत.
No comments
Post a Comment