४फेब्रुवारी-अकोल्यातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त
NEWS24सह्याद्री
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी एका व्यक्तीला हजार रुपयांची चिल्लर मागितली होती. संबंधित व्यक्तीने त्यांना चिल्लर दिली, त्याबदल्यात आरोपींनी पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या. मात्र थोड्याच वेळात या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्याने संबंधित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली, या प्रकरणातील आरोपीची झाडझडती घेतली असता, त्याच्याकडून चलनातील खऱ्या 500 च्या 108 नोटा एकूण 54 हजार रुपये तसेच 500 च्या 1200 बनावट नोटा आणि एक स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment