पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा
NEWS24सह्याद्री
चंद्रभागेच्या पाण्यात भाविक स्नान करून बाहेर येताच त्यांच्या अंगाला खाज सुटणे अश्या अनेक प्रकारचे त्रास होत असल्याची भाविकांची तक्रार आहे.पंढरपुरात गेल्या नंतर विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे .मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसंच या पाण्यात आळ्या आणि किडेही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळं तातडीने चंद्रभागेतील पाणी प्रवाहीत करून नदीचं प्रदूषण दूर करावं अशी मागणी वारकरी आणि स्थानीक नागरीकांनी केली आहे.
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे म्हणत विठुरायाच्या दर्शनाला येणारे हजारो भाविक आधी चंद्रभागेचे पवित्र स्नान करतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात. वारकरी संप्रदायात विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होण्यास सुरुवात झाली असून स्नान करून बाहेर आले की अंग खाजवायला सुरुवात होत असल्याची तक्रार भाविक करू लागले आहेत.
सध्या कोरोना सुरु असून याच पाण्यात स्नान केल्यामुळे त्वचा विकार वाढू लागले आहेत. या पाण्यात जनावरे आणि वाहने देखील धुतली जात असल्याने पाण्याला घाण दुर्गंधी येत आहे. विठ्ठल दर्शनाला देशभरातून येणार भाविक हा या पवित्र पाण्याने स्नान करतो तसेच हे पाणी तीर्थ म्हणून घेतो. मात्र प्रशासन या प्रदूषित पाण्याबाबत विचार करीत नसल्याने याचा फटका रोज हजारो भाविकांना बसत आहे.या गोष्टीला आळा बसण्यासाठी ठराविक दिवसानंतर चंद्रभागेतील पाणी बदलण्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न केल्यास भाविकांना होणारे आरोग्याचे त्रास कमी होतील अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे . प्रशासनाचा गलथानपणा पाहायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीपुन्हा चौकशी केली तर भाविकांना भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना त्यांना समजतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
YOU MAY ALSO LIKE
Error loading feeds! Check if your blog is public, contains at least a label in all articles and that you've allow your blog feed as full! if the problem still please do not hesitate to contact us.
No comments
Post a Comment