७ फेब्रुवारी-किरीट सोमय्या यांचे शिवसेनेवर पुन्हा गंभीर आरोप
पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून आता कारवाईची मागणी केली जात आहे.दरम्यान किरीट सोमय्या यांनाही रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
“शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं.अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,”असाआरोप देखील किरीट सोमय्यांनी केला आहे.
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत.
No comments
Post a Comment