आर्वी गर्भपात प्रकरणानंतर आता सरकारचे मोठे पाऊल
NEWS24सह्याद्री
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री, आरोग्य मंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री, आरोग्य मंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आभासी पद्धतीने ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमटीपी आणि पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, गृह व न्याय विभगाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करण्याची सूचना देखील देखील करण्यात आल्या . तसेच या प्रशिक्षणात पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी केली आहे. तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एमटीपी कायदा 2021 हा सुधारीत कायदा लागू करण्यासाठी जिल्हास्तरीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या. आर्वी येथील गर्भपात प्रकरणाची मंत्रालयानेही दखल घेतली असून आता राज्यात अशा घटना होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राज्याच्या गृह विभागाच्या वतीने एमटीपी कायदा सुधारित आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याची माहिती दिली. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पॉक्सो कायद्याशी संबंधित जनजागृती करण्याचे तसेच राज्य व जिल्हा स्तरावर मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
No comments
Post a Comment