Breaking News

1/breakingnews/recent

४फेब्रुवारी -विद्यार्थ्यांना मिळणार 8 महिन्यांचा एकत्रित पोषण आहार

No comments



NEWS24सह्याद्री 

पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील 4 हजार 550 शाळांमधील 4 लाख 76 हजार विद्यार्थ्यांना एकत्रित गेल्या आठ महिन्यांचा पोषण आहार वाटप होणार आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार टन तांदूळ लागणार आहे. तांदळासह कडधान्य व डाळींचेही वाटप होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी सुरूकेली आहे.

     राज्य सरकारच्या 21 जानेवारी 2022 च्या परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जून 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीतील 194 कार्यदिनासाठी विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप केला जाणार आहे. शासन नियमानुसार पहिली ते आठवीपर्यंच्या अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. त्यात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, तसेच महापालिका अशा एकूण 4 हजार 550 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये पहिली ते पाचवीचा पट 2 लाख 86 हजार 497, तर सहावी ते आठवीचा पट 1 लाख 90 हजार 223 एवढा आहे. अशा एकूण 4 लाख 76 हजार 720 विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे. एप्रिल 2021 पर्यंतचा पोषण आहार वाटप झालेला आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील पोषण आहार जून 2021 पासून वाटप झालेला नव्हता. नोव्हेंबरमधील दिवाळी, नाताळ व इतर सुट्या वगळता जून 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीतील 194 कार्यदिनासाठी हा पोषण आहार वाटप होणार आहे.

    यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 100 ग्रॅमप्रमाणे 19 किलो 400 ग्रॅम तांदूळ, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला प्रतिदिन 150 ग्रॅमप्रमाणे 29 किलो 100 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे. या प्रमाणे 4 लाख 76 हजार विद्यार्थ्यांना 11 हजार 93 टन तांदूळ लागणार आहे. याशिवाय पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 964 रूपये व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 1445 रूपये किमतीच्या दाळी व कडधान्यही मिळणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *