Breaking News

1/breakingnews/recent

झुंडचं धमाकेदार गाणं रिलीज

No comments

 NEWS24सह्याद्रि 

                            


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा 'झुंड'  या  चित्रपटामधील आया ये झुंड  है हे गाणं नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाणं अतुल गोगावले  यांने गायले आहे. अजय आणि अतुल या दोघांनी हे गाणं लिहिले असून हे गाण्याला संगीत देखील त्यांनी दिलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.

गाण्यामध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलं देखील दिसत आहेत. तसेच गाण्यामध्ये अभिनेता आकाश ठोसर देखील दिसत आहे. आकाश या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. सैराट या चित्रपटामुळे आकाशला विशेष लोकप्रियता मिळाली. 

झुंड चित्रपटाचे कथानक हे  विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित असणार आहे, असं म्हणटलं जात आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम तयार केली होती. याच कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 








No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *