१२ फेब्रुवारी- कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार?
NEWS24सह्याद्रि
पुण्यातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के असून राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्के. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "शिवजयंती साजरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात शिथिलता आणणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहोत" प्रवास करण्यास मनाई असल्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
"कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे 15 ते 18 वयोगटालीत लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर सध्या थिएटरमधे 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांशी बोलून यामधेही शिथिलता आणणार आहे असहि अजित पवार म्हणाले आहेत,
No comments
Post a Comment