६ फेब्रुवारी-नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू
NEWS24सह्याद्रि
नागपूर येथे जिल्ह्यातील शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॅाक लागून एका बिबट्याचा मृत्यू झालाय. रामटेक परिसरातील पंचाळा शिवारात ही घटना घडल्याच स्पष्ट झालाय तर या प्रकरणी शेतीत विद्युत प्रवाह सोडणाऱ्या नंदू शिवरकर याला अटक करण्यात आलीय.
वन्यप्राण्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी नंदू शिवरकर यांनी विज तारा सोडल्या, या तारांना स्पर्श झाल्याने दोन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. यात नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आलीय. रामटेक-पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्कजवळील टॉवरजवळच्या शेतात ही घडना घडली. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याला स्पर्श झाला.यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे . मात्र, याबाबत वनविभागाला शुक्रवारी माहिती मिळाली.आणि त्यानंतर रामटेकचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केलिए . तर शनिवार याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि त्या नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आला.
No comments
Post a Comment