१२ फेब्रुवारी-वाईन विक्रीचा वाद सुरुच निर्णय लांबणीवर
NEWS24सह्याद्रि
याच अनुषंगाने येत्या सोमवारपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन पाऊलं मागे घेण्याचं ठरवलं आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे हे यापूर्वीच अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. आज या विभागाच्या सचिव वत्सला नायर या याबाबतचे पत्र घेऊन आण्णा हजारे यांच्या भेटीला जाणार आहेत.याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे होणारे दुष्परिणाम सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
No comments
Post a Comment