Breaking News

1/breakingnews/recent

१३फेब्रुवारी-मोदींचा उद्या पंजाब दौरा

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

 पंजाबमध्ये काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे उद्या पंजाबमध्ये प्रचारासाठी दौरा करणार आहेत.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात निवडणुका होत आहेत. राजकीय नेते या निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे उद्या सोमवार पंजाबमध्ये प्रचारासाठी दौरा करणार आहेत. एका बाजूला भाजपची तयारी तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विरोधाला भाजपला सामोर जावं लागणार  आहे. पंजाबमध्ये मतं मिळवण्यासाठी भाजपनं पंतप्रधान मोदींच्या तीन रॅलींचे आयोजन केले आहे.

शेतकरी संघटनांच्या विरोधामुळे पंतप्रधान मोदी 5 जानेवारीला फिरोजपूर येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहू शकले नव्हते. शेतकर्‍यांनी त्यांचा काफिला वाटेत अडवला होता. त्यानंतर हा वाद आणखी वाढला होता. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी पहिली व्हर्च्युअल रॅली घेतली होती. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा उद्या पंजाबच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधाला नेमके कसे सामोरे जायचे हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे.


 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *