४फेब्रुवारी-राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
NEWS24सह्याद्रि
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी चीनकडून करण्यात येणाऱ्या आयातीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अली आहे या संबतीचा एक व्हिडीओ देखील गांधी यांनी शेअर केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर त्यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.या अर्थसंकल्पावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना चीनचा संदर्भ दिला आहे. 'जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना' असे ट्वीट करत राहुल गांधी चीनकडून भारत करत असलेल्या आयातीवर टीका केली आहे.
दरम्यान, राहु गांधी यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी यूपीए सरकार आणि एनडीए सरकारची आकडेवारी दिली आहे. यामध्ये 2014 पासून चीनमधून आयात वेगाने कशी वाढत आहे हे सांगितले आहे. तसेच राहुल गांधी यांनी संसदेत दिलेल्या भाषणाची एक क्लीप देखील त्यांनी शेअर केली आहे. 50 वर्षानंतर प्रथमच देशात एवढी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. मेक इन इंडियाची चर्चा केली मात्र, युवकांना रोजगार काही मिळाला नाही. गेल्या 7 वर्षांमध्ये सरकारने लहान उद्योगांवर आक्रमण केले आहे, असंघटीत क्षेत्र सरकारने संपवले असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
YOU MAY ALSO LIKE
video
No comments
Post a Comment