मोदी महाराष्ट्राची माफी मागणार का?
NEWS24सह्याद्रि
मुंबईसह राज्यात एकीकडे काँग्रेस आंदोलन करत असताना दुसरीकडे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते. फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.
‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगा’ अशा घोषणा यावेळी फडणवीसांसमोर देण्यात आल्या. काँग्रेसचा मोर्चा सागर निवासस्थानी आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे हे कार्यकर्ते जमले होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की, नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. माफी मागायची असेल तर देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने मागावी.
“कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
No comments
Post a Comment