११फेब्रुवारी- संप पुढे ढकलला
बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ, कर्मचारी आणि कामगार संघटनांनी फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांचा संप जाहीर केला होता, सेंट्रल ट्रेड युनियन आणि इतर संघटनांनी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक संपाची घोषणा केली होती, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हा संप आता पुढील महिन्यात मार्चमध्ये होणार आहे.
23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप पुकारण्यात आला होता. मात्र आता यावर ताजे अपडेट असे आले आहे की, हा संप आता 28 आणि 29 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन एआईबीओसी ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे
No comments
Post a Comment