४ फेब्रुवारी-मुंबईला आयआयएम मिळण्याची शक्यता
NEWS24सह्याद्रि
आर्थिक राजधानी मुंबई असल्यानं नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. त्यामुळे वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येत असते.
लवकरच मुंबईला देखील आयआयएम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरींग, मुंबईचे आयआयएममध्ये रुपांतर करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्यानं नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. त्यामुळे वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येत असते. यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
No comments
Post a Comment