४ फेब्रुवारी- मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट-अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.अमृता फडणवीस म्हणतात, मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट; महापौरांनी प्रत्युत्तरात म्हटले...अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केला. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. हा नवीन जावईशोध लावला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या दाव्यावर टीका केली. मागील काही महिन्यांपासून 'ऐकावे ते नवल', अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यात येत आहेत. भाजपच्या संबंधित लोकांमुळे होत असलेल्या वक्तव्यामुळे लोकांचे करमणूक होते. मात्र, आता लोकंही त्यांच्या अशा वक्तव्याला कंटाळले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. मुंबईला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
No comments
Post a Comment