१३फेब्रुवारी -राष्ट्रवादीत वाढलं कलाकारांचं इनकमिंग
NEWS24सह्याद्रि
अभिनय क्षेत्रात आपली पहिली इनिंग खेळणाऱ्या आसावरी जोशी आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी 'चतुरस्त्र अभिनेत्री' म्हणून आसावरी जोशी यांची ओळख आहे.अभिनय क्षेत्रात आपली पहिली इनिंग खेळणाऱ्या आसावरी जोशी आता राजकारणात प्रवेश करणार आहेत.आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे.आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट,मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे.सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. नव्वदच्या दशकात 'सर्फ अल्ट्रा'च्या जाहिरातीतील 'ढूंढते रह जाओगे' हा त्यांचा डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता.
आसावरी जोशींनी जवळपास गेल्या चार दशकांपासून आपल्या अभिनयानं कलाक्षेत्राला समृद्ध केलं आहे. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटकं आणि जाहिरातींमधून त्यांच्या सकस अभिनयानं प्रेक्षकांमध्ये त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला.अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्या घरा-घरांत पोहोचल्यात.
1986 मध्ये आलेल्या 'माझं घर, माझा संसार' या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पन केलं होतं. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. 2001 मध्ये दुरचित्रवाणीवरील 'ऑफिस-ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती. त्यांनी 'सुवरी' या नाटकात अभिनय केला होता. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'प्यार जिंदगी है' हा होता.जोशी यांनी 1989 मध्ये 'धाम धूम' आणि 'एक रात्र मंतरलेली' या चित्रपटांत काम केले. तर 1991 मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी जोशी यांची 1993 मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका 'जबान संभालके' मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती. 'सुखी संसाराराची 12 सुत्रे' आणि 'बाल ब्रह्मचारी' यासारख्या चित्रपटांचाही आसावरी या भाग होत्या. त्यांची 'फॅमिली नंबर 1' या मालिकेतील शालिनीची भूमिकाही फार गाजली होती.
No comments
Post a Comment