Breaking News

1/breakingnews/recent

७ फेब्रुवारी -सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

No comments

  NEWS24सह्याद्री 

धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी अत प्रतिक्रिया दिल्या आहेत केलं आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यावंर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसणीचं प्रतिनिधित्व करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

नुकतेच नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं.यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितलं की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात हरिद्वार येथे पार पडलेल्या धर्मसंसेदत मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधानं कऱण्यात आली. तर दुसरीकडे रायपूर येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मोहन भागवत यांनी संघ आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत असं म्हटलं आहे.

“वीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संघटन याबद्दल सांगितलं होतं, परंतु त्यांनी हे भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन सांगितलं होतं. कोणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही,” असंही सरसंघचालक म्हणाले. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *