Breaking News

1/breakingnews/recent

१२फेब्रुवारी-फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा

No comments

 NEWS24सह्याद्रि 

जगभरात कोरोनाचा कहर कायम असल्याने सर्व देशात लसीकरणावर भर   दिला जात आहे. फायझर  आणि बायोटेकच्या  ने कोविड19 लसीच्या 6 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरासाठी परवानगी मागितली होती. मात्र, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासना  ने अधिक माहिती आवश्यक असल्याचे सांगत मंजुरी प्रक्रिया किमान दोन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे. FDA ने पुढच्या आठवड्यात लसीसंदर्भात चाचणीच्या माहितीवर आधारित निर्णय घेण्याची योजना आखली होती त्यानुसार सरकारही 21 फेब्रुवारीपर्यंत लसीकरणासंदंर्भात मोठी घोषणा करणार होते. FDA ने कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे फायझरला लसीचा मोठा साठा उपलब्ध करण्यास तसेच लहान मुलांसाठीच्या लस उपलब्धतेसाठीही लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितले होते. 

अमेरिकेचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी फायझर आणि बायोटेकच्या लसीच्या आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठीच्या विनंतीनंतर आलेल्या नवीन चाचणी माहितीचे पुनरावलोकन केले आहे. दरम्यान याबाबत कोणताही अधिकृत निर्णय देण्याआधी यासंदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

FDA ने पुढे सांगितले की, पाच वर्षाखालील वयोगटातील अंदाजे 18 दशलक्ष बालकांसाठी लस उपलब्ध होण्यासाठी पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एफडीएने पालकांना खात्री दिली आहे की एजन्सी लसीच्या अधिकृत वापरासाठी निर्धारित केलेल्या मानकांची पूर्तता करत आहे आणि त्यासाठी खात्री करण्यासाठी पुरेसा वेळ घेत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *