Breaking News

1/breakingnews/recent

११फेब्रुवारी-अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून १०.९ कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे.

ईडीच्या सूत्रांनुसार २०१८ आणि २०२० च्या काळात एजन्सीने Innowave द्वारे दोन कथित संशयास्पद व्यवहार केले. पहिले ३.८१ कोटी रुपये अंश इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडला दिले होते, जी धवंगळेंच्या नियंत्रणात आहे. ते पैसे साहित्य आणि अंतर्गत कामासाठी खर्च म्हणून दाखवले आहे. परंतु बदल्यात कोणतंही काम केलं गेलं नाही, तसेच साहित्य देखील दिले गेले नाही, असं सत्यजीतने म्हटलंय. दुसरे पेमेंट २०१९-२० मध्ये, धवंगळेच्या नियंत्रणाखाली असलेल्या अॅडव्हान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आणि ग्लोबल बिझनेस अॅडव्हायझरी सर्व्हिसेस या दोन कंपन्यांना ७.१० कोटी रुपयांचे होते. इथेही कोणत्याही सेवा देण्यात आल्या नव्हत्या.

“अजय धवंगळे हे नागपूरचे असून त्यांचे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. तसेच ते अनिल देशमुख आणि हृषिकेश देशमुख यांना ज्ञानेश्वरी येथे भेटत होते,” असे सत्यजीत यांनी निवेदनात सांगितले आहे.

सुमारे १०.९ कोटी रुपयांची रक्कम अजय ढवंगळे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांच्याकडे गेली की नाही, असे विचारले असता, यासंदर्भात अजय धवंगळे अधिक चांगलं उत्तर देऊ शकतील कारण ते अनिल देशमुखांच्या जवळचे आहेत, असं सत्यजीत यांनी सांगितलं.त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *