१२ फेब्रुवारी - पुष्पा फॅन चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
'झुकेगा नही साला' हा पुष्पा चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरला. पुष्पा चित्रपटाच्या वेडापायी चक्क दोन आरोपींना पोलिसांसमोर झुकावे लागले आहे. नंदुरबार पोलिसांनी पदम कोळी यांचे पन्नास हजारांचे अनुदान लंपास करणाऱ्या या दोन्ही आरोपींनी जेरबंद करत त्यांच्याकडुन पैस हस्तगत केले. पदम कोळी यांच्या पत्नीचे कोरोनाची लागण झाल्यानं निधन झाले त्यामुळे त्यांना हे अनुदान देण्यात आले होते. हे अनुदान चोरट्यांनी लंपास केल्याने पदम कोळी हवालदिल झाले होते. त्यांच्या घरची हालाखीची परिस्थीती पाहुन त्यांना नंदुरबार पोलिसांनी स्वखिशातुन वर्गणी काढुन पन्नास हजारांची मदत केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात सदरच्या चोरट्यांच्या कटींगमध्ये पुष्पा नाव कोरल्याची माहीती होती. त्यानुसार पुढील तपास करत पोलिसांनी अशी कटींगवाल्या इसमाचा तपास करुन या प्रकरणात तळोदा तालुक्यातील दोघांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरीचे पन्नास हजार हस्तगत केले आहे. आता तर चोरट्यांकडुन मिळालेल्या अनुदानाची रक्कमही पोलीस न्यायालयाच्या निर्णयानंतर परत करणार असल्याने पिडीताला दुहेरी आधार मिळाला आहे.
पदम कोळी यांचे 50 हजार चोरीला गेल्यानंतर त्यांच्या हलाखीच्या परिस्थिती संदर्भात समजल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यांना पोलीस कल्याण निधीतून मदत केली होती. आपले चोरीला गेलेले पैसे परत मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेली मदत करण्याची तयारी दाखविली मात्र पोलिसांनी त्याला विनम्र नकार दिला. यानंतर पदम कोळी यांच्या चेहऱ्यावर हवभावतून पोलिसांच्या बदल आदर दिसून आला.
No comments
Post a Comment