Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी-नाशिक मध्ये ‘शिवशाही’ची खांबाला धडक

No comments


 NEWS24सह्याद्रि  

एकीकडे सरकारने एसटीचा संप मिटल्याची घोषणा केली.मात्र,दुसरीकडे अजूनही बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील एसटीसेवा विस्कळीत झाली आहे. जे कर्मचारी कामावर आहेत, त्यांच्यावरही ताण वाढला आहे. नाशिकमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघात याच ताणातून झाला आहे का,असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

नाशिकमध्ये  शिवशाही बस  खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात  एक जण ठार, तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे तर है अपघात तपोवन कॉर्नर भागामध्ये हा झाला असून ही बस नाशिकहून औरंगाबादकडे जात होती. मात्र, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट उड्डाणपुलाखालील 44 नंबरच्या खांबावर जावून आदळली. दरम्यान, दुसरीकडे अजूनही पुरेसी बससेवा सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. जे काही मोजके कर्मचारी कामावर आहेत त्यांच्यावर ताण वाढला आहे. एसटी महामंडळाने नवीन कर्मचारी भरतीही पुरेशी केली नाही. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. कदाचित शिवशाहीचा झालेला अपघात हा कामाच्या अती ताणातून झाला नसेल ना, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

नाशिकहून शिवशाही बस औरंगाबादकडे निघाली होती. ही बस तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे शिवशाही थेट उड्डाणपुलाखाली असलेल्या खांबावर जावून आदळली. यावेळी समोर असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याचे अजून नाव समजू शकले नव्हते. उड्डाणपुलाच्या 44 नंबरच्या खांबाला ही बस आदळली. या अपघातामध्ये इतर सहा जण जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, अजूनही एसटीचा संप मिटल्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही बससेवा सुरळीत सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *