Breaking News

1/breakingnews/recent

१३ फेब्रुवारी-आयुक्तांनी जनतेचा अपमाण केला-नवनीत राणा

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी भेट नाकारून माझा नाहीतर जनतेचा अपमान केला असल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्या आहेत.अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकीच्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी काल आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही.त्यांनतर खासदार राणा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अटक असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांना भेटू दिलं नाही. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि खासदार राणा यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. भेटीनंतर खासदार राणा यांनी पोलीस कोठडीत अटक असलेल्या कार्यकर्त्यांना होत असलेल्या मारहाणीची तक्रार उपयुक्तांना केल्याची माहिती दिली. तसेच राजकीय दबावाखाली आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर 307 कलमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची तक्रार केंद्राकडे करणार असल्याचं सांगितलं. 

   राजापेठ पोलीस स्टेशनमधून खासदार राणा जिल्हा रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती असलेल्या कार्यकर्त्याला भेटायला गेल्या.मात्र सुरुवातीला तिथेही पोलिसांनी नियमांचं कारण पुढे करून त्यांना भेट नाकारली. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. खासदारांसह केवळ चार व्यक्तींनी रुग्णालयात जावं यावरून हा वाद झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून राणा यांना भेटीची परवानगी दिली. अमरावती पोलिसांनी आपला अपमान केला असून खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आणि आपल्याला रुग्णालयात अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांना निलंबित करू, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार नवनीत राणा यांनी या भेटीनंतर दिली.








 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *