१४ फेब्रुवारी - सिद्धांत करतोय बिग बींच्या नातीला डेट?
NEWS24सह्याद्रि
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्याच्या 'गेहराईंया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. चित्रपटातील सिध्दांत आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीनं अनेकांचं लक्ष वेधलं. पण चित्रपटाबरोबरच सिद्धांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकतीच सिद्धांतनं अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या म्हणजेच नव्या नवेली नंदा च्या एका फोटोवर खास कमेंट केली. या कमेंटमुळे आता सिद्धांतचं नाव नव्या नवेली नंदा सोबत जोडलं जात आहे.
नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. नव्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नव्यानं यूनाइटेड नेशनसोबतच्या तिच्या नव्या प्रोजेक्टचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिचे काही कॅनडीड फोटो आहेत. सिद्धांतनं नव्याच्या या फोटोवर हार्टच्या इमोजीची कमेंट केली. त्यामुळे आता हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न सिद्धांत आणि नव्याच्या चाहत्यांना पडला आहे.
No comments
Post a Comment