११ फेब्रुवारी- राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
NEWS24सह्याद्रि
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने आता याबाबत निकाल दिला.
न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.
No comments
Post a Comment