१४ फेब्रुवारी - तीन वर्षापूर्वी आज पूर्ण देश रडला होता
NEWS24सह्याद्रि
आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय.मात्र, तीन वर्षांपासून हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केलाय. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले.
दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते. आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहिद झालेल्या 40 शहिदांमध्ये सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतापजनक व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
No comments
Post a Comment