Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी-टाटांची नॅनो कार 'या' रुपात पुन्हा रस्त्यावर धावणार?

No comments

 


NEWS24सह्याद्रि 

भारतातील आतापर्यंतची स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा नॅनो कार पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.टाटांची नॅनो कार 'या' रुपात पुन्हा रस्त्यावर धावणार का?अशी उत्सुकता आता सर्वत्र सुरु आहे, मध्यमवर्गीयांच्या कारच्या स्वप्न पूर्ण करणारी टाटा नॅनो कार पुन्हा एकदा रस्त्यावर धावणार आहे.टाटा नॅनो आता नव्या रुपात लाँच होणार असल्याचे वृत्त आहे. टाटा नॅनोची विक्री घसरल्याने या कारचे उत्पादन बंद करण्यात आले होते. ही कार लाँच होण्याआधीच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा टाटा नॅनो लाँच होणार आहे.    

इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी पॉवरट्रेन बनवणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्हीने (Electra EV) टाटा नॅनोला कस्टमाइज करून इलेक्ट्रिक कारचे रुप दिले आहे. कस्टम बिल्ट 72V Nano EV कारला रतन टाटा यांना पाठवण्यात आली तेव्हा त्यांनाही नवीन रुप आवडलं. रतन टाटा यांना या कारमध्ये बसून प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी रतन टाटा यांचा तरुण मित्र शांतनू नायडू सोबत होता. याबाबत  Electra EV ने लिंक्डइनवर फोटो पोस्ट करून माहिती दिली. 

      टाटा नॅनो कार लाँच झाली तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला. कमी किंमतीत कार उपलब्ध होत असल्याने मध्यमवर्गीयांना या बजेट कारला चांगला प्रतिसाद दिला. घरासमोर कार असावी हे अनेकांच्या मनातील स्वप्न टाटा नॅनोने पूर्ण केले. मात्र, काही वर्षांनंतर कारच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. त्याचा परिणाम कारच्या किंमतीवरही झाली. सातत्याने बदलत असलेले तंत्रज्ञान, सरकारचे नवीन नियम यांमुळे कारच्या किंमतीत वाढ होऊ लागली होती. त्याशिवाय इतर कार कंपन्यांनीदेखील टाटा नॅनोच्या स्पर्धेत इतर कार बाजारात आणल्या होत्या. टाटा नॅनो कारचे उत्पादन 2018 मध्ये बंद करण्यात आले. रतन टाटांच्या अपेक्षेनुसार या कारला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अत या नविन कारला लोकांचा कितपत प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासारखे आहे  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *