१३ फेब्रुवारी-अमिताभ,आमिर,अजय आणि टायगर आमने सामने
NEWS24सह्याद्रि
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बॉलिवूड सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत.एप्रिल 2022 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन,अजय देवगण,आमिर खान आणि टायगर श्रॉफ सारख्या सेलिब्रिटींचे सिनेमे आमने-सामने येणार आहेत.
14 आणि 29 एप्रिलला हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.त्यामुळे एप्रिलमध्ये बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे.आमिर खानचा 'लाल सिंघ चड्ढा' आणि यशचा 'केजीएफ 2'14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.तर अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचा 'रनवे 34' आणि टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2'29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
No comments
Post a Comment