Breaking News

1/breakingnews/recent

५फेब्रुवारी-हिंगणघाट जळीतकांड प्रकरण;अद्याप निकाल नाही

No comments

 


NEWS24सह्याद्रि 

 हिंगणघाट मधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत.हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे.संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याची माहिती आहे.  3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट इथं आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आलेत. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.

हिंगणघाट मधील शिक्षिकेच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. आज त्या संदर्भात हिंगणघाटच्या न्यायालयात निकाल अपेक्षित होता. मात्र, आजही निकाल लागणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर ती शिक्षिका शिकवत असलेल्या मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात नैराश्याचे वातावरण झाले आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असल्यामुळे या प्रकरणी निकाल लवकर लागेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, घटनेला दोन वर्ष झाले तरी नराधम आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही हे दुर्दैवी असल्याचे मत महाविद्यालयातील सहकारी शिक्षक व शिक्षिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर रहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *