Breaking News

1/breakingnews/recent

१२ फेब्रुवारी-नागपूर शहरात पाच ठिकाणी आग,मोठ्या प्रमाणात नुकसान

No comments

                               

NEWS24 सह्याद्रि 

नागपूर शहरात एकाच दिवशी पाच आगीच्या घटना घडल्या. त्यामुळं या आगी का लागल्या. याची कारणे वेगवेगळी असली, तरी शंकेला वाव आहे. आग विझविण्याचे आवाहन अग्निशमन विभागापुढं होते. त्यामुळं त्यांची चांगलीच कसरत झाली.यशोधरानगर परिसरातील लाकडाच्या कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात लाकडाचे दरवाजे तसेच भुसा आणि केमिकलपासून दरवाजे तसेच फ्रेम बनविल्या जात होत्या. लाकूड असल्याने आग वाऱ्यासारखी पसरली. मात्र फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलिसांनी या ठिकाणी पोहचत काम सुरू केलं. 9 फायरच्या गाड्यांच्या माध्यमातून आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आग सतत भडकत होती. त्यामुळे आजूबाजूला धोका वाढला होता. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शेवटी आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती फायर ऑफिसर ए. चंदनखेडे यांनी दिली.

नागपूर शहरातली ही आग लागण्याची एकच घटना नव्हे, तर इतर पाच ठिकाणी अशा आगी लागल्या. पोलीस क्वॉर्टरच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला शुक्रवारी पहाटे आग लागली. लगेचच आगीचे लोळ सर्वत्र पसरले. अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. तीन बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यात ढोबळे यांच्या फ्लॅटमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तिसरी घटना अजनी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोरील आशा मेडिकल स्टोअर्सला आग लागली. यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

चौथी घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास इतवारी भागातील नमकगंज येथे घडली. तुळशीराम उमरेडकर यांच्या छतावरील स्टोअर रूमला आग लागली. आगीने जवळच्याच आत्माराम टॉवर इमारतीलाही आवाक्यात घेतले. या भीषण आगीमुळे गर्दी जमली होती. या घटनेत डॉ. श्याम छाडी यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच या ठिकाणी गंजीपेठ व सिव्हील लाईन येथील अग्निशमन केंद्रातील चार गाड्या रवाना करण्यात आल्या. पाचवी घटना, सायंकाळी सहाच्या सुमारास कांजी हाऊस येथील आरामशीनला शॉट सर्किटमुळे आग लागली.तर वेगवेगळ्या पांच ठिकाणी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुसान झाल्याचे निदर्शनास आले आहे ,




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *