१३ फेब्रुवारी-धारणीत कौटुंबिक वाद विकोपाला
NEWS24सह्याद्रि
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेटविले. या आगित पत्नी जास्त प्रमाणात भाजल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धारणी मुख्यालयापासून 32 किलोमीटर अंतरावर बैरागड आहे. बैरागड येथील निवासी नासीर शेख गफूर याचा पत्नीसोबत वाद झाला. कौटुंबिक हिंसेतून त्याने आपल्या पत्नी नसीमा बानो हिच्या अंगावर रॉकेल टाकले.असा गंभीर आरोप नसीमा बानोचे वडील शेख हफिज व आईने केला आहे. घटनेची माहिती धारणीत पसरतात संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबातील आई आणि वडिलांनी ही माहिती दिली. त्या माहितीनुसार नसीमाचे पती नासीर शेख गफुर हे नेहमीच पत्नीबद्दल कुरकूर करत होते. वेगवेगळ्या कारणांन तिच्यासोबत भांडण करत. तिला मारहाण करत असतं. इतकेच नव्हे तर या भांडणांमध्ये नसीमाला नेहमीच सोडचिठ्ठी देण्याची धमकी देत होता. शिवाय जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता.
शनिवारी सकाळची घटना.नासीरची धमकी प्रत्यक्षात आली. रॉकेसलच्या भडक्यात नसीमा जवळपास 83 टक्के जळाली. आता तिची परीस्थिती नाजूक आहे. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार नसीमाला पती नासीरसह तिच्या कुटुंबियांनी यासाठी मदत केली. तिचा देर सद्दाम, हुजेब, जाबीर, आफ्रोज यांनी मिळून रॉकेल टाकून टाळले. जळालेल्या अवस्थेमध्ये नसीमाला सर्वप्रथम बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने तिला तिथून धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
नसीमाच्या कुटुंबाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुद्धा गंभीर आरोप लावलेत. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य उपचार केला नाही. उलट पाठीमागच्या दारातून नसीमाला धारणीत पाठविले. इतकेच नव्हे तर नसीमाच्या भावाचे कॉलर पकडले. दवाखान्याच्या बाहेर हाकलले. असा सुद्धा आरोप नसीमाच्या भावाने लावला आहे. धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. तपास पोलीस करीत आहेत.
c
No comments
Post a Comment