१४ फेब्रुवारी - खासदार संभाजीराजेंचं उपोषणास्त्र?
NEWS24सह्याद्रि
मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उपोषणाला बसणार असल्याची माहिती नुकतीच समजण्यात आलिये,मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.'सरकारकडून मागील दीड वर्षापासून मागण्यांचा पाठपुरावा करून देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय संभाजीराजेंनी घेतला असल्याचे समजत आहे.
काय आहेत मागण्या
1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात
2) 'ओबीसी'च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा
3) 'सारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा.
No comments
Post a Comment