७ फेब्रुवारी-शिर्डीकरांचा आठवणींना उजाळा
NEWS24सह्याद्री
लता दिदींच्या स्वर आठवणी या कुठपर्यन्त मर्यादित आहे अस नाहीच त्या जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचलेल्या आहेत,श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या चारही प्रहरच्या आरत्या, त्याचप्रमाणे ‘एव्हरीबडी लव साई’ हे हिंदी साईभक्तिगीत गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वरबद्ध केले असून साईंच्या प्रचार प्रसारामध्ये लतादीदींचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. २००५ मध्ये लता मंगेशकर व त्यांच्या भगिनी उषा या साईंचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा साई दर्शनाने मनोमन समाधान व आनंद वाटतो असे त्यांनी सांगितले होते. ही त्यांची आठवण आजही सर्व शिर्डीकरांच्या मनावर कोरली गेली आहे. या आठवणीसह इतरही अनेक आठवणींना शिर्डीकरांनी उजाळा दिला आहे.
लता मंगेशकर या साईभक्त होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यावर साईंच्या शिकवणीचा पगडा होता.साईबाबांच्या सर्वधर्मसमभावाची व श्रद्धा,सबुरीची शिकवण त्यांच्या राहणीमानातून,आचरणातून दिसून येत होती. त्यांनी साईबाबांची मराठी व हिंदी गीते गायली. ती गीते अजरामर झाली आहेत. त्यांनी गायलेली साई गीते आजही देश-विदेशात गाजली आहेत व साई मंदिरात आजही पहाटे ही साई गीते भक्तिभावाने लावली जातात. लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाची जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबांवर अतुट श्रद्धा होती. साधारणपणे २००५ मध्ये साईसंस्थानचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात लता मंगेशकर व त्यांची बहीण उषा मंगेशकर साईदर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्या वेळी लतादीदींच्या हस्ते साईसमाधीची पाद्यपूजा व आरती करण्यात आली होती. त्या वेळी संस्थानचे माजी अध्यक्ष स्व.जयंतराव ससाणे तसेच विश्वस्त सुरेश वाबळे, विश्वस्त कैलासबापू कोते, विश्वस्त स्व. अशोक खांबेकर, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, साईसंस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment