७ फेब्रुवारी-राणेंना आज दुहेरी धक्का
आज ची सुनावणी पुढे ढकल्याने आणि नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे.अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी गोट्या सावंत यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना आता स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No comments
Post a Comment