Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी -मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

No comments

NEWS24सह्याद्री  

आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं यावेळी  विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे. आपल राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल.  50 एकरात हे राजभवन आहे.  इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्याचबरोबर  दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे.  एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर  आहेत.  अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असं ही ते म्हणाले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *