६ फेब्रुवारी-दोन दलित तरुणांनी मंदिरात प्रवेश केल्यानं वाद
लातूर जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी मंदिर प्रवेशाशी संबंधित वादावरून स्थानिक दलित समुदायावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची घटना घडली आहे. यावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीनंतर हा वाद मिटला असून परिस्थिती आता सामान्य झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी निलंगा तहसीलमधील ताडमुगली गावात दोन दलित तरुणांनी हनुमान मंदिरात प्रवेश करून नारळ फोडला. त्यावरून वाद निर्माण झाल्याचा दावा काही सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. काही तरुणांनी त्यांच्या मंदिरात प्रवेश करण्यास आक्षेप घेतला आणि नंतर इतर जातीतील लोकांनी गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे.
आजच्या आधुनिक युगातही असा प्रकार घडल्याने सर्वत्र या चर्चेला उधान आले आहे...
No comments
Post a Comment