Breaking News

1/breakingnews/recent

१३ फेब्रुवारी-सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द

No comments

                                

NEWS24सह्याद्रि 

सह्याद्री एक्सप्रेससह अनेक एक्सप्रेस कायमच्या रद्द करण्यात आल्या आहेत.तसेच यापुढे पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं कोल्हापूर-मुंबई-सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.

रेल्वेच्या नवीन धोरणानुसार,केवळ हंगामामध्ये फुल्ल, इतरवेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत.याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

यापुढे फक्त 150 किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 150 कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे.त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *