Breaking News

1/breakingnews/recent

११ फेब्रुवारी-शेअर बाजारात विक्रीचा सपाटा

No comments

                                

NEWS 24 सह्याद्री
आज जवळपास सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आoilहे.आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रामध्ये तर 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. गुरुवारी शेअर बाजारामध्ये आलेल्या तेजीला आज लगाम बसल्याचं दिसून आलं आहे.आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 773.11 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 231 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,152.92 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,374.80 वर पोहोचला आहे. आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 105 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी अशा सर्वच सेक्टरच्या शेअर्सची विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. मंगळवारी शेअर बाजारातGrasim Industries, Tech Mahindra, Infosys, HCL Technologies आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून IOC, IndusInd Bank, NTPC, Tata Steel आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे..

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *