NEWS24सह्याद्रि
जालना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांचा अखेर पोलिसांना शोध लागला आहे. गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले संग्राम ताटे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पोलिसांना आढळून आले आहेत. 2 तारखेला पत्नीला मित्राकडे जातो म्हणून निघून गेलेले ताटे तेव्हापासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जालना पोलिसांनी त्यांच्या शोधत तीन पथके तयार केली होती. दरम्यान काल रात्री ते सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामधील महामार्गावरील जुन्या टोलनाक्याजवळ आढळून आले. दरम्यान त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
No comments
Post a Comment